Monday, 14 April 2014

(46) माझ्या कानड्या मल्हारी (खंडोबा गीत)

।। यळकोट यळकोट जय मल्हार ।।

माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी ।।धृ।।

तुझ्या कानडं कानडं पणाला
बानू भाळली भाळली गुणाला
यावं भक्‍ताच्या भक्‍ताच्या वाड्याला
देवा सोडावी सोडावी जेजुरी ।।०१।।

बानू देवाची देवाची आवडी
शेळ्या मेंढ्यांच्या मेंढ्यांच्या परवडी
दह्या दुधाच्या दुधाच्या कावडी
घुसळण घातील घातील मंदिरी ।।०२।।

माझा देव हो देव हो झालाय येडा
लुटी धनगर गावड्याचा वाडा
असतील आपुल्या आपुल्या हो नडी
या हो पावन होईल ही पिढी ।।०३।।

शिवराईत जागर मांडिला
वाघ्या-मुरळीनं भंडार उधळिला
दीपमाळ ही उजळावी वक्‍ताला
हुईल आनंद यळकोट अंतरी ।।०४।।

स्वर - शाहीर पुंडलीक फरांदे
http://www.aathavanitli-gani.com/Song/Majhya_Kanadya_Malhari

No comments:

Post a Comment