गाथा धनगरी इतिहासाची,.
शौर्याची, पराक्रमाची,.
निष्ठेची अन जन-कल्यानाची,.
सदैव सांगत राहीन मी, गाथा धनगरी इतिहासाची…..
अनेक सम्राट, राजे-महाराजे जन्मले याच कुळी,.
पण अजुनी न जाणिले आम्हीं त्यांचे कार्य कधी,.
करुनी देण्या जान त्यांच्या त्या कार्यांची,

अनेक स्थापिली साम्राज्ये अन संस्थाने,.
पण राहिली न आठवण आम्हां त्यांच्या कर्तृत्वाची,.
करुनी देण्या नित्य आठवण त्या सुवर्ण काळाची,.

पुरुषांनी तर घडवलाच इतिहास,.
पण स्त्रियांचे पाऊलही मागे नव्हते,.
पेटविण्या पुन्हा ज्योत ती स्वाभिमानाची,.
सदैव सांगत राहीन मी, गाथा धनगरी इतिहासाची… ..
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
http://milind-dombale.blogspot.com/2013/11/blog-post_4922.html

No comments:
Post a Comment