आम्ही धनगर धनगर, असू धनाचे आगार ।
माळरानांवरी राखितो, आमचे दुभते पशुधन ।।
निळ्या नभाच्या छताखाली, आम्ही हिंडतो रानोरानी ।
धरणी माय-माऊली आमची, करी माया लेकारांवरी ।।
आमची काळी-पांढरी मेंढर, जीव लावतीया हो फार ।
धेनू मानितो मातेसम, कल्पतरू तिचे हो गुण ।।
ढोल-कैताळाच्या साथीन, गजी खेळीतो रातभर ।
देवांच्या आठवणीपायी, आम्ही मांडीतो सुंबरान ।।
भाळी लावितो भंडारा, घेतो खांद्यावरी घोंगडी ।
धनगरी बाणा आमचा, भाषा असे रांगडी ।।
ओळख अनेक नावांनी, या भारत देशात ।
परी विसरुनी सारे भेद, गर्जतो 'धनगर सारा एक' ।।
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
http://milind-dombale.blogspot.com/2014/03/blog-post_27.html

No comments:
Post a Comment