(२६ जानेवारी २००९) गणतंत्रदिनी नवी दिल्लीत राजपथवर महाराष्ट्रातर्फे सादर करण्यात आलेल्या धनगर राजाच्या चित्ररथाला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. अँटणी यांनी शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान केला. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक केरळच्या पुरन फेस्टिवलच्या चित्ररथाने तर तृतीय क्रमांक जम्मू काश्मीर आणि तमिळनाडूला विभागून देण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्राने तब्बल आठ वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
२६ जानेवारी रोजी राजपथवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवणारे धनगर समाजाचे जीवनचरित्र चित्ररथात मांडण्यात आले होते. धनगर समाजाची नृत्य, त्यांची वेशभूषा, वाद्ये यांचा या चित्ररथात समावेश होता. नवी दिल्लीत झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संचालक एम.एस. राजपूत, एम.एस. पाटील, कला दिग्दर्शक विनोद गुरूजी उपस्थित होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/---/articleshow/4162734.cms
No comments:
Post a Comment