महान तपस्विनी गंगा सुरवन्तीच्या पोटी आयोनी संभव जन्म घेऊन श्री बीरदेवांनी धनगर कुलाचा उद्धार केला. बिरदेवांचे बालपण चिंचली तालुका रायबाग येथे मायाक्काच्या घरी गेले. तेथे त्यांनी काही दिवस मेंढ्या राखल्या. काही देव्पानाच्या खुणा भक्तांना दाखवल्या. मेंढ्या राखत असता त्यांनी नारद पुरचा राजा नारायणाचा (मामाचा) गर्व हरण केला व मामाची कन्या कामवती बरोबर विवाह केला. तेथून त्यांनी अग्र्यायानी नदी तीरी मूरगुंडी (जि. बेळगाव) येथे घोर तपशर्या केली. त्यांच्या तापला प्रसन्ना होऊन पंढरीचा देव श्री विठ्ठलाने बीरदेवास भेट देऊन तप समाप्ती केली. श्री विठ्ठल बीरदेव ही हरिहरची जोडी भक्तीला भुकेली असल्याने त्यांनी अनेक भक्तांना भेट दिली. ऐनापुरात त्यांनी भक्त कोडया ननगोडाची कन्या सिधाव्वा ही भागीरथी रूपाने विठ्ठलाची मानस कन्या झाली. श्री बीरदेवाने विठ्ठलाच्या सहकार्याने कर्नाटकात अत्याचार करीत माजलेल्या गजलिंग आणि रेदेसुर या दोन्ही महाबलाढ्या दैत्याच्या वध (संहार) केला.
अनेक भक्तांच्या गाठीभेटी घेत उभय देव हे हुक्केरी परिसरात आले. तेथे मेंढ्या राखीत असलेल्या धनगरांची साधुत्व कळा जाणून श्री विठ्ठल बीरदेवांना नमस्कार केला. व देवांना त्यांनी प्रेमाने पिण्यासाठी मेंढीचे दुध दिले ते पिऊन तृप्त झाल्यावर त्या धनगरांना श्री विठ्ठल बीरदेवांनी आशीर्वाद दिला व वर्षातून दोन वेळा आमच्यासाठी दुध घेऊन येण्यास सांगितले. तेथू उभय देव वढगोल, सदलगा, ढोनेवादी, रेंदाळ, हुपरी, तळंदगे, कणेरीमठ, तामगाव, वसगडे येथून पट्टणकोडोलीस आले. पट्टणकोडोली या गावी मुक्काम केल्यावर त्यांनी सोमा म्हालदारा करवी गावातल प्रमुख निंग्गुशा पाटील, जकाप्पा चौगुले, जणू सुतार व नरहरी तराळ यांना घेऊन ग्रामदैवत भगवान कल्लेश्वराची भेट घेतली व वास्तव्यासाठी खडकाच्या माळाची मागणी केली. कल्लेश्वर हे शिव अवतार व बीरदेव हे ही शिव अवतार कल्लेश्वरानी हरीहराची विनंती मान्य करून खडकाच्या विस्तीर्ण माळ उभय देवांना बहाल केला.पट्टणकोडोली मध्ये वास्तव्यासाठी असलेल्या नारायण गावडे नावाचा एक धनगर राहत होता. त्यांची श्रद्धा आणि भक्ती पाहून उभय देवांनी आपली सेवा करण्यास त्यास संधी दिली. हे स्थान महात्म्य वाढावे म्हणून श्री विठ्ठल बीरदेव एकांती विचार करू लागले. चैत्र्य महिन्यामध्ये श्री. ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला चाललेले लोक पाहून श्री विठ्ठल बीरदेव वाडी रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर येथे यात्रा पहावयास गेले. तेथे श्री ज्योतिर्लिंगाची ( केदारलिंगाची ) त्यांनी भेट घेतली आम्हासही यात्रेसाठी एक सद्भभक्त पाहिजे असे सांगताच श्री ज्योतिर्लिंग उभय देवांना म्हणाले, "येथे असंख्य भक्त जमले आहेत तुम्हाला हवे तितके घेऊन जा." श्री विठ्ठल बीरदेवांनी ज्योतिबाचा घोडा तळ्यातील चिखलात रुतवून भक्ताचे परीक्षण केले. खांद्यावर बालक घेऊन आलेल्या बुत्या तेली नावाचा एक भक्त त्यांच्या परीक्षेस उतरला त्या भक्तास दर्शन देऊन श्री विठ्ठल बीरदेव शिखर शिंगणापूर या स्थळी आले.
श्री. महादेवाची आणि श्री विठ्ठल बीरदेवांची भेट झाली. या ठिकाणी एक सद्भभक्त शोधण्यासाठी आम्ही आलो आहोत असे श्री विठ्ठल बीरदेवांनी महादेवांना सांगितले भगवान शंकर श्री विठ्ठल बीरदेवांना म्हणाले, " कितीतरी या ठिकाणी भक्त जमले आहेत त्यातील तुम्हाला पाहिजे त्या भक्तांना घेऊन जावा." असे भगवान शंकरांनी म्हटल्यानंतर श्री विठ्ठल बीरदेवांनी देवालयाच्या आवारात मायावी शक्तीने दोन मस्तवाल खोन्डांची झुंज लावली आणि यात्रेकरूस झुंज सोडविण्यास विनवणी करू लागले. ती झुंज सोडविण्यास कोणीही तयार होईना शेवटी नवोबा पाटील नावाचा एक सद्भभक्त त्या ठिकाणी आला. आणि तो श्रद्धापूर्वक त्या खोडांच्या सामोरा जाऊन त्याने ती झुंज सोडीवली. एकाच भक्त परीक्षेला उतरलेला पाहून श्री विठ्ठल बीरदेव आणि श्री. महादेवांनी नावोबा पातळस दर्शन दिले. नंतर महादेवांचा निरोप घेऊन श्री विठ्ठल बीरदेव पुढे मार्गस्त झाले.
श्री विठ्ठल बीरदेव परांडा या गावी आले तेथे पायाप्पा गावडे नावाचा एक भक्त त्यांना भेटला त्याच्या सांगण्यावरून श्री विठ्ठल बीरदेव अनगर ( अंजनगाव ) जिल्हा सोलापूर या गावी आले. या गावामध्ये नागव्वा नावाची शिवभक्त गृहिणी होती. तिला खेलोबा नावाचा एक मुलगा होता. तो मेंढ्या राखण्याचे काम करत होता. खेलोबा हा विरक्त आणि सदाचरणी होता. खेलूभ्क्तास यात्रेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण धेऊन जोडीचे भगवान पट्टणकोडोलीस रवाना झाले. ठरल्याप्रमाणे अश्विन महिन्यामध्ये यात्रेस सुरवात झाली. यात्रेचा प्रसंग साधून खेळूभक्त आपला परिवार आणि शिष्यागनासह पट्टणकोडोलीस आला. त्याच्या शिष्यागनाची नावे खालील प्रमाणे. देगावचा - गोन्दू, घाटणचा - महादू, मोहोळचा - भैरू, हिवाराचा - भावा आणि परंडयाचा - पायाप्पा गावडे.
खेळू भक्त हा आपल्या परिवार व शिष्यागनासह सिमोलंघन खेळून पट्टणकोडोलीस पायी चालत चालत आला. मृग नक्षत्राचा दिवस उगवला खेळूभक्त हा श्री विठ्ठल बीरदेवांचा शोध घेऊ लागला पण श्री विठ्ठल बीरदेव हे त्याच्या नजरेस कोठेही पडेनासे झाले त्यामुळे खेलुभक्त हा उदास आणि दुख्खी झाला. इकडे श्री विठ्ठल बीरदेवांनी नारू गावद्यांना सांगून सोमाम्हलदारा करवी गावातील रयीत लोकांना जमविले आणि ढोलवाद्यांच्या गजरात समजावून आणण्यास सांगितले. हा प्रचंड भक्त ( जन ) समुदाय पाहून खेलू उठला पण श्री विठ्ठल बीरदेवांची भेट झाली नसल्यामुळे खेलू हा कावराबावरा झाला. एवढ्या लांबून देवांच्या भेटीसाठी चालत आलो पण देवांनी मला भेट दिली नाही म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. त्यावेळी देवांनी नारू गावडे यांच्या करवी खेलूच्या हाती जोड तलवार दिली. त्या जोड तलवारीने खेलू हा पोटावर सपासप वर करून घेऊ लागला व नाचू लागला. कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेले असंख्य भक्त खेलूच्या अंगावर भंडारा फेकू लागले. अशा रीतीने खेलुभक्त हा नाचत नाचत श्री. विठ्ठल बीरदेवांच्या जवळ आला त्याच्या ( खेलूच्या ) अंगी देवांचा संचार झाला. श्री. विठ्ठल बीरदेवांच्या कृपेने आणि भांडाराच्या जोराने खेलूस काहीही इजा झाली नाही. खेलूच्या मुखातून जी भाविश्वनी बाहेर पडली यासच " फारांद्याची भाकणूक " असे म्हणतात त्यावेळी खेळूभक्तास श्री. विठ्ठल बीरदेवांनी प्रत्यक्ष दर्शन दिले. आजही परंपरेने खेळूभ्क्ताचे वंशज पट्टणकोडोलीस यात्रेस येतात आणि भाकणूक सांगतात.
कर्नाटकातील गजलींगा आणि रेडेसुर या दोन महाबल्याध्ध दैत्यांचा वध केल्या नंतर श्री. विठ्ठल बीरदेव हुक्केरी भागात आले. मालावर मेंढ्या राखणाऱ्या धनगर लोकांनी देव समजून श्री. विठ्ठल बीरदेवांना नमस्कार केला. आणि घोंगड्याचे आसन बसावयास टाकले. उभय देव आसनाधीन झाल्यावर त्यांनी प्रेमाने देवांना मेंढ्याचे दुध पिण्यास दिले. श्री. विठ्ठल बीरदेव दुध पिऊन तृप्त झाले. आणि त्यांनी त्यांना ( धनगर भक्तांना ) तुमचे अखंड कल्याण होवो असा आशीर्वाद दिला. वर्षातून दोन वेळा त्यांना पट्टणकोडोलीस दुध घेऊन येण्यास सांगितले. आजपासून सर्व लोक तुम्हास हेगडीप्रधान या नावाने ओळखतील असे सांगितले. त्यावेळी पासून आजतागायत परंपरेने ते हेगडी भक्त वर्षातून दोन वेळा म्हणजे अनंत पौर्णिमेला ते मेंढ्याचे दुध मातीच्या घाटातून घेऊन पायी चालत चालत पट्टणकोडोलीस येतात. व ते दुध श्री. विठ्ठल बीरदेवांना अर्पण करतात. मोठ्या संख्येने आलेल्या हेगडी भक्तांना आदराने धनगर समाजाच्या घरी भोजन व्यवस्था केली जाते. दुसर्या दिवशी त्याच्या उपस्थितीत गावातील गावकरी व मानकरी हे सर्व मिळून गावचावडीमध्ये यात्रेचा दिवस निश्चित करतात. हेगडी भक्त आलेल्या दुसऱ्या दिवशी सर्व भक्ताची व्यवस्था धनगर मेढके समाजामार्फत केली जाते. या उस्सवाला पट्टणकोडोलीमध्ये " हेगडी पोर्णिमा " असे म्हणतात. यानंतर हेगडी भक्त हे दुसऱ्या वेळेस दुध यात्रेस घेऊन येतात. यामध्ये सर्वप्रथम भात व मेंढीचे दुध हा नैवैध्य हेगडी भक्त हे श्री. विठ्ठल बीरदेवांना अर्पण करतात.
हुक्केरी परिसरात मेंढीचे दुध हे श्री. विठ्ठल बीरदेवांनी ज्या ठिकाणी प्राशन केले त्या ठिकाणी " कटी सिद्ध " देवस्थान प्रसिद्ध आहे. हेगडी भक्तांनी देवांना ( श्री. विठ्ठल बीरदेवांना ) रानामध्ये दुध दिले त्यावेळी दुसरी काही धनगर मंडळी देवांना नमस्कार करण्यास आली त्यावेळी एकाच्या हातामध्ये शिकार केलेला मृत ससा होता. त्यामुळे श्री. विठ्ठल बीरदेवांनी त्यांना दूर राहण्यास सांगितले आणि अहिंसेबद्दल उपदेश केला. नाराज झालेले भक्त हे श्री. विठ्ठल बीरदेवांना शरण आले आणि आपल्या हिंसक कृत्याचे प्रायशीत्त म्हणून आम्ही कायमपणे लांबूनच दर्शन घेऊ असे वचन श्री. विठ्ठल बीरदेवांना दिले. त्याप्रमाणे हे भक्त श्री. विठ्ठल बीरदेवांची यात्रेमध्ये पालखी निघाल्यावर पालखीचे लांबूनच दर्शन घेतात. हि परंपरा कायम चालू आहे. एनापुरातील कोड्या ननगोंडाचे वंशज पट्टणकोडोलीस देवदर्शनास येतात. श्री. विठ्ठलाने एनापुराच्या ( जि. बेळगाव ) कोड्या ननगोंडाच्या घरी मेंढ्या राखण्याची चाकरी केली. मुळचा दरिद्री असलेला ननगोंडा सावकार झाला. धनाचा आणि सत्तेचा त्यास अहंकार झाला विठ्ठला सारख्या साक्षात देवाला त्याने ओळखले नाही. विठ्ठलाचा ननगोन्डावर अपमान करून त्यास चाबकाने मारले. त्यावेळी विठ्ठल गुप्त झाले. ननगोन्डावर अनेक बाजूने संकटावर संकटे येऊ लागली. त्याची प्रापंचिक घडी बिघडली. त्यावेळी त्याचे डोळे उघडले आणि रानामध्ये जाऊन विठ्ठलाचा धावा करू लागला. दिवस रात्र तीन दिवस अगदी व्याकूळ झालेला ननगोंडा विठ्ठलास शरण आला. विठ्ठलाने ननगोंडास दर्शन दिले. व त्यास सदउपदेश दिला. ननगोंडाने वर्षाला तुमच्या दर्शनास येईन व प्रायशित्त म्हणून वेताची काठी, कांबळा आणि पायातील जोडा प्रतिवर्षी देवास अर्पण करण्याचे मान्य केले. ननगोंडाचे वंशज अद्यापही यात्रेच्या वेळी हातामध्ये वेताची काठी, कांबळा घेऊन व मुखामध्ये जोडा धरून श्री. विठ्ठलाला अर्पण करतात. हि परंपरा आजतागायत पट्टणकोडोलीमध्ये कायम चालू आहे.
http://www.vitthalbirdev7.co.in/?q=node%2F4
Nice
ReplyDelete