Thursday, 3 April 2014

(18) चपय नृत्य, गजे ढोल नृत्य

धनगरी गजे ढोल नृत्य हा नोकनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार असून महाराष्ट्रातील धनगर समाजासारखाच आंध्रप्रदेश, कर्नाटकात ही धनगर समाज गजे ढोल नृत्य करतो. यास थपेटू गुल्लू असे म्हणतात. ज्योतीबा, बिरोबा, मायाक्का, भोजलींग, खंडोबा या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या देवता, धनगर समाजात कनगर, सनगर, खुटेकर, सुपेकर अशा विविध प्रकारचे समाज बांधव असून या बांधवांनी आपली लोकसंस्कृती कायम ठेवली आहे. शेळी-मेंढी पालन, लोकर तयार करणे, घोंगड्या तयार करणे आदी रोजगाराची साधने या समाजबांधवांची आहेत. श्रमपरिहारासाठी मेंढवाड्यावर उघड्या माळरानावर धनगर बाण्या सादर करणे हे धनगर बांधवांचे रंजनाचे साधन. सर्व ढोलांचा एकच गजर म्हणजे गजे. या गजेसहे केलेले धनगर बांधव या नृत्यात करतात. दिवाळी, पाडवा अशा सणांशिवाय १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा राष्ट्रीय सणांनाही गजे ढोल नृत्य व धनगरी बाणा सादर केले जातात.

बिरोबाचा जन्म, बिरोबाची आई गंगा सुरावंतीचा जन्म, खंडोबाची जन्म, खंडोबा-बाणाई लग्न आदी कथा बाण्याव्दारे धनगर बांधव सादर करतात. बाण्या म्हणजे धनगरी ओव्या होत. आता या ओव्या पाहा.

कथांची नावे :- (बिरोबाच्या आईचा जन्म, गंगासुरावंतीचा जन्म, मायाक्का देवीची कथा, अहिल्याबाईची कथा, खंडेरायाची कथा, रामायण , महाभारत) आणि धनगरी बाण्या अश्या

१) सुंबरान मांडल भारत भूमिला ll
तिरंगी झेंड्याला राष्ट्राच्या ध्वजेला वंदन करुन ll
मात्या आणि नित्याला वंदन करुन ll
दोनी मार्ग दाखवले त्या गुरुला वंदन करुन ll
बसलेल्या तमामाला, आई बापाला शाहीरांचा मुजरा ll

२) पहीलं माझं नमन गंगाया मातेला ll
धन्य धन्य इठूराया ll
हल्लीच्या जमान्यात कलियुगाची तर्‍हा ll
लेक एकीना बापाचं जरा ll
मनतो बायको माझी लय शाहनी ll
विषय सुखाची लागली गोडी ll
भल्या भल्याच्या मोडल्या खोडी ll
खडकावर बगळा बसला ll

याप्रमाणे धनगर नृत्य सादर केले जाते.

http://apalemarathijagat.blogspot.com/2012/10/blog-post_2164.html

No comments:

Post a Comment