Thursday, 3 April 2014

(20) धनगरी ओव्या

धनगरी ओव्या या प्रकारातील गीतांमध्ये हालचालींना प्राधान्य असते. हा गीत प्रकार नगरांशी संबंधित आहे. व्युत्पतिशास्त्रानुसार ‘दन’ म्हणजे गुरेढोरे- या कानडी शब्दांपासून ‘धनगर’ हा शब्द आलेला आहे. ही गीते शंकराचा अवतार जो ‘बीरुबा’ याच्याभोवती गुंफलेली असतात. याविषयीची दंतकथा अशी आहे की फार पूर्वी एकदाएका वारुळातून मेढ्यांचे कळप बाहेर आले व ते शेतातील उभ्या पिकांचा फडशा पाडू लागले. दाद मागण्यासाठी लोकांनी शंकराकडे धाव घेतली तेव्हा त्याने धनगर निर्माण केले.

धनगर रंगीबेरंगी पोशाख करून एकत्र जमतात. एक भला मोठा ढोल वाजवणाऱ्याभोवती फेर धरून नाचू लागतात. जोषपूर्ण हालचाली असलेल्या या नाचाला ‘गजनृत्य’ (खुल्या मैदानात धनगरांनी केलेले सामूहिक नृत्य) म्हटले जाते. ‘ओव्या’ गीते बहुधा अहिराणी या बोलीभाषेत रचलेली असतात. त्यातून बीरुबाची कथा सांगितलेली असते. त्याची स्तुती केलेली असते. बहुधा काही लौकिक विषयांनाही त्यात स्पर्श केलेला असतो. भरीव, जोषयुक्त लय कडव्यांच्या शेवटी आघात देण्याची पद्धत आणि आवाजाची भक्कम फेक ही या खुल्या मैदानातील गायनाची खास वैशिष्टये. ‘ओवी’ हा (लोकसंगीतात उत्स्फूर्त रचनेसाठी वापरला जाणारा) छंद वापरल्याने रचनेतील लवचीकता व मार्दव निर्माण होते.

http://www.marathimati.net/sangeet-ashok-ranade/6/

1 comment:

  1. धनगराचा ढोलासंग बसतोया मेळ ग
    पिसाट लेल्या वाघिणी तू आगीसंग खेळ ग
    हे गीत मला मिळेल काय

    ReplyDelete