(राजन इंदुलकर यांच्या 'वंचितांमधे शिक्षणातून सामर्थ्य निर्मिती' या लेखामधील गवळी-धनगर समाजाविषयीची माहिती...)
हा समाज मुख्यत: कोकणातील पूर्वेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहातो. हा समाज मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या (रत्नागिरी जिल्ह्यातील) सहा तालुक्यांत सह्याद्रीच्या रांगांवर वस्ती करून आहे. त्यांची वस्ती अतिशय लहान म्हणजे पाच ते पंचवीस घरांची असते. एका घरात दोन ते पाच कुटुंबे राहातात. म्हणजे एका वस्तीवर सरासरी साठ ते सत्तर लोकसंख्या असते. हा गवळी-धनगर समाज सह्याद्रीच्या माथ्यावर पिढ्यानपिढ्या, साधारणपणे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीपासून राहात आहे. त्यांचा पूर्वीचा व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाच्या ने-आणीसाठी बैल पुरविणे, वाहतूक करणे असा होता. कालांतराने पर्वतात रस्ते झाल्यावर त्याला दुग्धव्यवसायाकडे वळावे लागले. पर्वतात दाट जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात गवताची टंचाई असते. त्यामुळे पाणी व गवतासाठी त्याला वर्षातून तीन ते चार महिने वस्ती सोडून इतरत्र जावे लागते. पाऊस पडू लागला की पुन्हा तो आपल्या वस्तीवर येऊन राहतो. दुधाचे सातत्य नसते. जनावरे फिरती असल्याने दूध फार मिळतही नाही. ते विकावयाचे तर डोंगर उतरून पाच-सहा मैल चालत येऊन गावात विकावयाचे. त्यातून मिळणार्या पैशावर मीठ-मिरची आणि जनावरांसाठी भुशीपेंड खरेदी करावयाची.

गावातील दुकानदाराकडे सारा हिशेब असतो. तो हिशेब शिलकीत कधीच नसतो. उलट देणे वाढल्यावर वर्षाकाठी एखाददुसरे जनावर विकावे लागतेच. भाकरीसाठी तो डोंगरउतारांवर रान साफ करून नाचणी, वरी पिकवतो तर भातासाठी गावातील खोतांची खंडी अर्धाखंडीची शेती मक्त्याने करतो. ही सारी कमाई जेमतेम पोट भरण्याइतपत असते. रात्रंदिवस बारा महिने कष्ट करावे लागतात. घरातील प्रत्येकाकडे कामाच्या जबाबदार्या असतात. सकाळी उठून शेण गोळा करणे, दूध काढणे, गुरे सोडणे, दूध घेऊन खाली गावात जाणे, पाणी भरणे ही नित्यनेमाची कामे असतात. शिवाय शेतीची कामे असतात. पाळलेली
जनावरे सोडल्यास स्वत:च्या मालकीचे असे काहीही नाही. या भागातील सार्या जमिनी खोताच्या मालकीच्या आहेत. वनखात्याची जमीन येथे नाही.
या डोंगरातून विखुरलेपणानं राहाणारा धनगर समाज खोतांच्या मर्जीनुसार तेथे राहतो. सभोवतालच्या जंगलाचा गरजेपुरता उपयोग करून घेणे, गरजेपुरती शेती करणे, राहाण्यासाठी घर, गोठे इ. बांधणे हे सारे काही खोतांशी गोडीगुलाबीने राहून करावे लागते. वेळोवेळी खोतांच्या हातापाया पडावे लागते. खोतांना गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडे मजुरीला जावे लागते. एखादा धनगर आपले ऐकत नसेल तर खोत त्याला गावच्या देवळात बोलावतात आणि देवासमोर नाक घासावयास लावतात. भात, नाचणीच्या मिळणार्या उत्पन्नातील चौथा हिस्सा डोक्यावर घेऊन, डोंगर उतरून गावात आणून खोतांच्या दारात टाकावा लागतो. झाडझाडोर्याचा मोबदला द्यावा लागतो. दुधाच्या व्यवसायात त्याला अजिबात फायदा मिळत नाही. सारा हिशेब गावातील दुकानदाराकडे ठेवलेला असल्याने त्यात फसवणूक होते.
अशा रीतीने एकेकाळी संपन्नावस्थेत राहाणारा गवळी-धनगर आज हतबल झालेला आहे. जनावरांचे, प्राण्यांचे ज्ञान, जंगलाविषयीची माहिती, कष्टाळूपणा, दुधाचा पारंपरिक व्यवसाय हे सारे जवळ असूनही तो आपल्या जगण्याविषयी अतिशय निराश बनला.
गवळी-धनगरांची मुले आठव्या-नवव्या वर्षीच करतीसवरती होतात. गुरे चरविणे, गोठा साफ करणे, धाकट्या भावंडांना सांभाळणे, जेवण करण्यास मदत करणे, पाणी भरणे, शेतीच्या कामात भाग घेणे इ. कामे मुलांना करावी लागतात. या काळात शाळेत जाऊन शिकणे त्यांना शक्य होत नाही. बहुतेक शाळा गावातील मुख्य वस्तीत आहेत. धनगर वस्तीपासून
या शाळांचे अंतर सुमारे तीन ते सहा कि. मी. एवढे असते. ही पाऊलवाट डोंगरदर्यातून, जंगलातून जाणारी असते. या स्थितीत गावातील शाळेत येऊन बसणे आणि शिकणे अतिशय दुरापास्त असते.
अलीकडल्या काळात चिपळूण तालुक्यातील या समाजाच्या पन्नास वस्त्यांपैकी पाच-सहा वस्त्यांत शासनाने शिक्षणाची सोय केली आहे. पण चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली तरी पुढचे शिक्षण घेणे अवघड असते. त्यामुळे
धनगरांच्या मुलांनी शिकून आपल्या जीवनाला वेगळे वळण द्यावे, अशी शक्यता दिसत नाही. या अपार कष्टांतून मुक्ती व्हावी म्हणून मुलांना अगदी लहान वयातच चिपळूण, पुणे अशा शहरात धाडतात. तेथे जाऊन ही मुले हॉटेलात वेटरची कामे करतात. तेथे मुलांना पोटभर खायला मिळते. यातून आमदनी वाढत नाही. एकूणच या गवळी-धनगरांचे संपूर्ण जीवन कष्टाचे, अगतिकतेचे आणि निराशेचे झाले आहे.
- राजन इंदुलकर
http://palakneeti.org/book/export/html/398
- राजन इंदुलकर
http://palakneeti.org/book/export/html/398
No comments:
Post a Comment