Thursday, 10 April 2014

(40) आम्ही धनगर (मराठी गीत)

बिरुबाच्या नावांन चांगभल !
खंडूबाच्या नावांन चांगभल !

आम्ही धनगर, माळरानांच, काळ्या मातीच,
दऱ्याखोऱ्यान, डोंगर माथ्याला, आम्ही राहणार,
धन मेंढर, काळं-पांढर, माझी लेकरं,
रानामाळांन चरत हुंदडत्याती दिसभर ।।१।।

पाहटच्या पाऱ्याला रं, झोंबऱ्या गारगार वाऱ्याला रं,
अन भाकर बांधून काठीला रं, अन घोंगड टाकून पाठीला रं,
अन काळा वाघ्या रं, येतो संगतीला, दिन-रातीला,
करी कळपाची राखण इमानी, मुकं जनावर ।।२।।

येताळ बाबाच्या माळाला रं, अन शिवराम तात्याची बाभळं रं,
अरं झकाटा लावलाय शेंडयाला रं, अरं मेंढर झोंबती शेंगाला रं,
गेली पाण्याला, कळपा-कळपानं, बांधा-बांधानं,
त्यांच्या मागून पळत निघालं त्याचं लेंढारं ।।३।।

अरं दिस रातीन गिळला, अन जाग आलिया माळाला,
अरं दिसभराच्या कष्टाला, आम्ही विसरू जगाला,
अरं ढोल वाजतो, गज्जा नाचत, ताल रंगतो,
बिरूदेवाच्या नवानं मांडला आम्ही जागर ।।४।।

हे गीत ऐकण्यासाठीची लिंक - http://www.youtube.com/watch?v=mlVH7Ox2ITM&hd=1

No comments:

Post a Comment