Wednesday, 12 November 2014

Bapu Biru Vategaonkar (बापू बिरू वाटेगावकर)


युवकांनी व्यसनाच्या आहारी जावून अमूूूल्य जीवन बरबाद न करता स्वत:ची शरीर संपदा सांभाळून अन्यायाविरोधात विचाराच्या ताकदीने प्रतिकार केल्यास समाजातील दुष्टप्रवृत्तीचा नायनाट होईल.
- बापू बिरू वाटेगावकर (फलटण, दि.१३ जून २०११)

Sunday, 9 November 2014

महाकवी कालिदास 'धनगर' होने के सबूत


अनेक वेबसाईट तथा ब्लॉगपर धनगर महापुरषोंकी सूचि में महाकवी कालिदासजी का नाम पाया जाता है। लेकिन उसीके लिखित सबूत उपलब्ध कराने के संदर्भ में मुझे कुछ संदेश आए थे। महाकवी कालिदास 'धनगर' होने के कुछ लिखित तथा दूसरे सबूत निचे दे रहा हूँ। 

००१. 'Encyclopaedia of Scheduled Tribes in India: In Five Volume' (English) By P.K. Mohanty (Page No-84)

००२. 'Martial races of undivided India' (English) By Vidya Prakash Tyagi (Page No-205)

००३. 'Home, Again' (English Novel) By Dr. Ulhas R. Gunjal (Page No-146)

००४. 'Socio-Economic Issues of ‘Dhangar’ Nomadic Communities in Maharashtra' (English Journal) By S.M. Kamble

इन चार सबूतोंके अलावा महाकवी कालिदासजी के जीवनपर आधारित कुछ चित्रपटों में भी उन्हें धनगर ही दिखाया गया है। 

००१. 'महाकवी कालिदास' (कन्नड) १९५५

००२. 'महाकवी कालीदासू' (तेलगू) १९६०

००३. 'कवीरत्न कालिदास' (कन्नड) १९८३

अभीभी महाकवी कालिदासजी के जीवन की इतर अनेक जानकारी में इतिहासकारों में विवाद है। महाकवी कालिदासजी के जीवनपर अधिक संशोधन होने की जरुरत है। 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Friday, 7 November 2014

The Great Saint-Poet Kanakadasa


भारत ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्वच धर्माच्या अनेक साधू संतांनी आपापल्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य मोठया प्रमाणावर केले. त्यांनी लिहून ठेवलेले साहित्यग्रंथ आजही त्याची प्रचीती देतात. कर्नाटकातील अशाच एका महान संताचा हा संक्षिप्त जीवन आढावा… 

संत कनकदास : एक संत, कवी, तत्वेत्ते तसेच रचनाकार म्हणून त्यांची ओळख अवघ्या देशाला आहे. संत कनकदासांचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातील बाड (ता-शिवार, जि-हावेरी) येथे १५०९ साली एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिराप्पा तर आईचे नाव बचम्मा होय. संत कनकदासांचे मूळ नाव हे थिमाप्पा होते. तरुणपणात थिमाप्पांना एक खजिना मिळाला होता,त्याचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग न करता समाजकार्यासाठी तो देऊ केला. त्याचमुळे थिमाप्पा यांना कनकदास (कनक-सुवर्ण) या नावानी ओळखले जाऊ लागले.

त्यांचे समाजीक एकात्मतेचे कार्य हे खरंच सर्वांना अजूनही प्रेरणादायी असेच आहे. संत कनकदासांनी आपल्या जीवन काळात अनेक कीर्तने, सामाजिक-धार्मिक गीते तसेच रचना रचल्या. त्यातील नलचरीत्र, हरीभक्तीसार, नृसिंहस्तव, रामधन्यचरीत्र आणि मोहनतरंगिनी या त्यांच्या प्रमुख रचना मानल्या जातात. या व्यतिरिक्तही त्यांनी शेकडो कीर्तने तसेच सामाजिक-धार्मिक गीते रचली व समाजीक एकात्मतेसाठीच जीवन अर्पिले.

​सदैव लोककल्याणाचा विचार करणाऱ्या संत कनकदासांनी तिरुपती येथे जीवनातील शेवटचे दिवस घालवले. १६०९ मध्ये ह्या महान संताचा, कवीचा, तत्वेत्याचा तसेच एका महान रचनाकाराचा मृत्यू झाला. त्यांचा शारीरिक मृत्यू झाला असला तरीही संत कनकदासांचे वैचारिक रूप आजही जनमाणसांत जिवंतच आहे. 

चित्रपट सृष्टीलाही संत कनकदासांच्या विचारांची ओढ लागली नाही असे नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला 'भक्त कनकदास' हा १९६० सालचा कन्नड चित्रपट त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला. तसेच अनेक गीते व नाटके यातून आजही संत कनकदासांचे कार्य समाजापुढे आणन्याचा प्रयत्न सुरूच असतो.

त्याचबरोबर संत कनकदासांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून कर्नाटक राज्य सरकारने 'कनकदास जयंती' रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच त्या दिवशी संपूर्ण राज्यभर सर्वच छोटया-मोठया गावात-शहरांत विविध कार्यक्रमांचे तसेच मिरवणूकींचे आयोजन केले जाते व संत कनकदासांच्या विचारांचा जागर मांडला जातो. 

अशा एका थोर संताच्या विचारांचा उपयोग राज्याच्या अथवा भाषेच्या सीमा न घालता सर्व समाजांच्या प्रबोधनासाठी केला जावा हीच अपेक्षा…!

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Thursday, 6 November 2014

Maharaja Yashwant Rao Holkar

H.H. Maharajadhiraj Raj-Rajeshwar Sawai Shrimant Yashwant Rao Holkar 
(Born - 03 December 1776, Coronation - 06 January 1799, Died - 28 October 1811)